किशोर वयात मुलांची भरभरून वाढ होत असताना कधी कधी मुले चुकीच्या वाटेवर वळू शकतात. त्यांचे सर्वच वागणे बदलते असे नाही; परंतु एखाद्या बाबतितले वागणे खूपच बदलून जाते. कधी कधी हा बदल मुलाने तंबाखू, दारू किंवा ड्रग्सचे सेवन सुरू केल्यामुळेही असू शकते. एखाद्या यादीमधेच दिलेली लक्षणे पालकांना दिसतील असे नाही. तसे प्रत्येक व्यक्तीमधे वेगवेगळे लक्षण दिसू शकतात. त्यामुळे ड्रग्स सेवनाच्या आणि त्याला मिळणा-या प्रतिसादाच्या वेगवेगळ्या पाय-या समजून घेतल्यास पालकांना मार्ग काढणे सोपे जाऊ शकते.
Read more
Add comment (0)
Hits: 1360
















