Tuesday, Jun 19th

Last update:12:55:00 PM GMT

वर्ष २०१०

गुटखा बहाद्दरांच्या मुसक्‍या आवळणार

Print PDF
०६ जनवरि २०११
मुंबई, भारत

गुटखा, तंबाखू चघळत पिचकाऱ्या मारून सार्वजनिक ठिकाणी लाल सडा शिंपणाऱ्या बहाद्दरांच्या मुसक्‍या आवळण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. राज्यभर 10 ते 16 जानेवारीदरम्यान ही मोहीम राबविली जाणार असून, ज्या दिशेला तोंड त्या दिशेला पिचकारी मारणाऱ्यांना जागच्या जागी 200 रुपये दंड करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले असून, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला स्वतंत्र पत्र पाठवून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर छापे घालण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत सूत्रबद्ध मोहीम राबविण्यात येणार असून, यावर महसूल आयुक्‍त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी देखरेख ठेवण्याची सूचना सरकारने केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

राज्यात सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने कायदा 2003 अस्तित्वात आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला प्राधिकृत करण्यात आले आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा साठा जप्त करून दंड केला जाईल. सार्वजनिक ठिकाणी या उत्पादनांचे सेवन आणि धूम्रपान करणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. राज्यातील मोहिमेचा अहवाल प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एकत्रित अहवाल अन्न व औषध प्रशासन आयुक्‍तांनी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

Read more...

More Articles...

Page 1 of 38

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारन्याकारिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिकिया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू
प्रतिकिया कळवा
Manthan Award

Link to Aarogya

NASSCOM Award